Dainik Maval News : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने हॉटेलमध्ये येऊन वेटरला मारहाण केल्याच्या किरकोळ वादातून आणि रागातून हॉटेल मालकाने मित्राचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. मंगळवारी (दि. 27 नोव्हेंबर) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास इंदोरी बायपास (ता. मावळ) येथील हॉटेल जय मल्हार समोर ही घटना घडली.
अक्षय दत्तात्रय येवले (वय 30, रा. कुंडमळा, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार (वय 27, रा. कानेवाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रसादचा मित्र अभिषेक अशोक येवले (वय 31, रा. कानेवाडी, ता. मावळ) हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरी बायपास येथे असलेल्या हॉटेल जय मल्हार येथे मंगळवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास प्रसाद उर्फ किरण पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले यांनी जय मल्हार हॉटेलमधील वेटरला मारहाण केली. प्रसाद, अभिषेक आणि हॉटेल मालक अक्षय हे मित्र आहेत.
वेटरने आपल्याला मारहाण झाल्याची माहिती मालक अक्षय येवलेला दिली. अक्षयने प्रसाद व अभिषेक यांना भांडण करु नकोस असे सांगितले, परंतु फोनवर दोघांची यावर बाचाबाची झाले. त्यानंतर रात्री रात्री साडेअकरा वाजता प्रसाद आणि अभिषेक हे धारदार शस्त्र घेऊन पुन्हा हॉटेलजवळ आले. तेव्हा अक्षय येवले हॉटेल बंद करीत होता. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाले, यावेळी अक्षयने त्यांच्याकडील शस्त्र घेऊन त्या दोघांवर वार केले.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे व तेथून पवना हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यावेळी जखमी प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याचा मृत्यू झाला. तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अक्षय येवले याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News
– आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष