Dainik Maval News : कामशेत येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 6 लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवार, दिनांक 4 एप्रिल ते रविवार, दिनांक 6 एप्रिलच्या दरम्यान ही घरफोडी झाली. याप्रकरणी यशराज हेमेंद्र किनावाला (वय 28 वर्षे, व्यवसाय, रा. मंत्रा टाऊनशिप, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नातलग राहुल नवीन प्रभू यांचे घर कामशेतमधील गरुड कॉलनी येथे आहे. त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडले आणि कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील 6 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने लंपास केले. पुढील तपास कामशेत पोलिस करीत आहेत. ( House burglary in Kamshet cash and gold ornaments looted )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number