राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत फुट पाडत त्यातील बहुसंख्य आमदार आणि काही खासदार यांना सोबत घेत थेट सत्तेत सहभागी झाले आहेत. रविवारी (दिनांक 2 जुलै) रोजी जेव्हा हे सत्तानाट्य झालं, त्यानंतर अनेकांना धक्का बसला. यात सर्वाधिक संभ्रमावस्थेत कुणी गेलं असेल तर ते होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी. यातही आता दादांसोबत की साहेबांसोबत हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळेच अनेक कार्यकर्ते सध्या आमदार जिकडे तिकडे आपण अशी भुमिका घेताना दिसत आहेत. यातूनच अजित पवार यांच्या सोबत किती आमदार आणि शरद पवार यांच्या सोबत किती आमदार, याबाबत चर्चा होताना दिसत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या तरी राष्ट्रवादीचे कोणते आमदार नक्की कुणाकडे, याची अंतिम यादी समोर आली नसली किंवा तसे कुणीही अधिकृतरित्या जाहीर केले नसले, तरीही अजित पवार यांच्या शपथविधीपासून त्यांच्यासोबत वावरणारे आणि त्यांचे कट्टर असे काही आमदार आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत असलेले किंवा त्यांना समर्थन देत साहेबांसोबत असल्याचे सांगणाऱ्या आमदारांचा एक गट आहे. ( How many NCP MLAs are with Ajit Pawar and how many MLAs are with Sharad Pawar? See the full list )
अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संभाव्य यादी –
1. अजित पवार (बारामती)
2. छगन भुजबळ (येवला)
3. दिलीप वळसे पाटील (आंबेगाव)
4. हसन मुश्रीफ (कागल)
5. धनंजय मुंडे (परळी)
6. धर्मराव बाबा आत्राम (अहेरी)
7. माणिकराव कोकाटे (सिन्नर)
8. नरहरी झिरवाळ (दिंडोरी)
9. आदिती तटकरे (श्रीवर्धन)
10. दत्तात्रय भरणे (इंदापूर)
11. दौलत दरोडा (शहापूर)
12. शेखर निकम (चिपळूण)
13. सरोज अहिरे (देवळाली)
14. किरण लहामटे (अकोले)
15. अशोक पवार (शिरूर)
16. संजय बनसोडे (उदगीर)
17. अनिल पाटील (अमळनेर)
18. सुनील टिंगरे (वडगाव शेरी)
19. निलेश लंके (पारनेर)
20. सुनील भुसारा (विक्रमगड)
21. अतुल बेनके (जुन्नर)
22. संग्राम जगताप (अहमदनगर)
23. आशुतोष काळे (कोपरगाव)
24. चेतन तुपे (हडपसर)
25. सुनिल शेळके (मावळ)
26. अण्णा बनसोडे (पिंपरी)
27. दिलीप मोहिते (खेड आळंदी)
शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संभाव्य यादी –
1. जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा)
2. राजेश टोपे (घनसावंगी)
3. अनिल देशमुख (काटोल)
4. जयंत पाटील (इस्लामपूर)
5. बाळासाहेब पाटील (अहमदपूर)
6. शामराव पाटील (कराड उत्तर)
7. प्रकाश सोळंके (माजलगाव)
8. राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा)
9. नवाब मलिक (अणुशक्ती नगर)
10. प्राजक्त तनपुरे (राहुरी)
11. बाळासाहेब आजबे (आष्टी)
12. राजू कारेमोरे (तुमसर)
13. मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव)
14. दीपक चव्हाण (फलटण)
15. अशोक पवार (शिरूर)
16. मकरंद जाधव (वाई)
17. चंद्रकांत नवघरे (बसमत)
18. इंद्रनील नाईक (पुसद)
19. मानसिंग नाईक (शिराळा)
20. नितीन पवार (कळवण)
21. रोहित पवार (कर्जत जामखेड)
22. राजेश पाटील (चंदगड)
23. सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ)
24. दिलीपराव बनकर (निफाड)
25. यशवंत माने (मोहोळ)
26. बबनराव शिंदे (माढा)
27. संदीप क्षीरसागर (बीड)
खरे तर ही यादी समोर आलेली असली तरीही ती अधिकृत यादी नाही. किंवा तशी घोषणा करण्यात आलेली नाही. कारण दोन्ही बाजूंनी अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. जयंत पाटील यांनी दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असे सांगितले आहे. तर अजित पवार यांच्यामते सर्व आमदार त्यांच्या सोबत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच यात आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे अनेक आमदारांनी आपली भुमिका उघडपणे मांडलेली नसून ती राखीव ठेवली आहे. एक ते दोन दिवसांत आपसी भुमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! शरद पवारांनी दिल्लीत केला मोठा बदल, ‘या’ विश्वासू नेत्याकडे सोपवली महत्वाची जबाबदारी
– ‘मी उद्यापासून बाहेर पडणार..लोकांमध्ये जाऊन भुमिका मांडणार..पक्षाबद्दल कुणी काही दावा केला तरी भांडत बसणार नाही’ – शरद पवार