आपल्या भारतात रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापरही केला जातो. उदाहरणार्थ एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे अॅड्रेस प्रूफ म्हणूनही मान्य केले जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारताचे नागरिकत्व असणारा देशातील प्रत्येक नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षाखालील मुलांचे नाव हे पालकांच्या रेशन कार्डमध्ये जोडले जाते. तर दुसरीकडे 18 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास तुम्ही स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात. रेशनकार्ड काढण्यासाठी असणारी कागदोपत्री प्रक्रिया ही अनेकांसाठी त्रासदायक ठरते. परंतू आता सरकारने ऑनलाईन प्रक्रिया सुरु केल्याने हा त्रास निम्म्याहून कमी झाला आहे.
आता नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डची नावे वगळायची / समाविष्ट करायची असल्यास, रेशन दुकानदाराबाबत कोणतीही तक्रार करायची असल्यास ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 33.60 रूपये इतके नाममात्र शुल्क भरून प्रक्रिया करता येते. यासाठीचा सेवा कालावधी हा 30 दिवसांचा आहे. तसेच वेळेत सेवा न मिळाल्यास तक्रारही करता येऊ शकते.
अर्ज करण्यासाठी लिंक – https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx
तक्रार करण्यासाठी लिंक – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx
अधिक वाचा –
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी
– ‘सफर गड दुर्गांची’, वडगावमध्ये लहान मुलांसाठी किल्ले अभ्यास मोहिमेचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर
– राजपुरी – नवलाख उंब्रे मार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल