Dainik Maval News : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषदेच्या विविध स्तरावर यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये खडकाळा- ब या बीटातील खांडी केंद्रातील अतिदुर्गम खांडी शाळेने घवघवीत यश मिळविले.
खांडी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या गटाचे लोक नृत्य, भजन, कविता गायन बुद्धिबळ, मुलींची लंगडी, मुलांचा आट्यापाट्या खेळ, मुलांची कबड्डी, लहान गटात लिंबू चमचा, बेडूक उड्या या सर्व कला क्रीडांमध्ये सहभाग नोंदविला होता.
दोन दिवसीय स्पर्धेमध्ये खांडी शाळेचा इयत्ता ५वी चा विद्यार्थी नक्ष तुकाराम भोकटे या विद्यार्थ्याने मावळ तालुकापातळीवर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला, तसेच मुलांच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक पटकावून खांडी शाळेचे नाव मावळ तालुक्यात झळकवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख केदार सर, वडेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख मोरमारे सर, शालेय व्यवस्थापन अध्यक्षा सावित्री शिवराम नगरकर, सरपंच कुंडलिक निसाळ,माजी सरपंच अनंता पावशे, मुख्याध्यापिका सुरेखा बारवकर, मार्गदर्शक शिक्षक ठाकरे सर, सुषमा खरात मॅडम ,शेख सर, समस्त पालक वर्ग सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News