व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील

येत्या काही दिवसातच आषाढी वारीला सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 7, 2023
in पुणे, महाराष्ट्र, शहर
chandrakant-patil-pune

Photo Courtesy : Twitter / Chandrakant Patil


अनेक वारकरी बांधवांची इच्छा असते की, आपला अंतिम काळात श्रीक्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी येथे व्यतित करावा. त्यामुळे अशा वारकरी बांधवांसाठी सुखात राहता यावं; यासाठी लवकरच लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. आषाढी वारीनंतर चंद्रकांत वांजळे गुरुजींच्या उपस्थित भूमिपूजन करुन, सदर इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. येत्या काही दिवसातच आषाढी वारीला सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत. तत्पूर्वी कोथरूड परिसरातील दिंड्यांना आणि भजनी मंडळांना पालकमंत्री चद्रकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संत पूजनाचा सोहळा देखील पार पडले. याप्रसंगी 15 दिंडयाचे प्रमुख, भजनी मंडळ आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव उपस्थित होते. ( hundred room building will be constructed in alandi said pune guardian minister chandrakant patil )

ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, अनंत (बाप्पू )सुतार अध्यक्ष, सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडगे, शैलेश जाधव अध्यक्ष, विठ्ठल मित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. त्याचे 24 प्रयोग होणार असून, नाट्यप्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहेत. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

संयोजक गिरीश खत्री म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून ‘संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्य वाटप’ टाळ, मृदंग, वीणा, तंबू, रेनकोट, बॅग या साहित्याचे वाटप होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. आमचे वडील आम्हाला कायम सांगायचे की साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा. आज खोरोखरचं दिवाळी दसरा असल्याची प्रचिती येत आहे.”

या सोहळ्याच्या सुरुवातीला ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे अतिशय श्रवणीय असे कीर्तन पार पडले. यावेळी ते म्हणाले, मालक, चालक हे ज्या प्रमाणे महत्वाचे असतात त्याप्रमाणे पालक देखील महत्वाचे असतात. आज हा लॉन्स म्हणजे पंढरीचे वाळवंट असल्याची अनुभूती दादा आणि गिरीश खत्री यांच्यामुळे येत आहे. चंद्रकांतदादांनी वाटप केलेल्या या साहित्याचा निश्चितच वारकऱ्यांना उपयोग होईल असे ते म्हणाले.

अधिक वाचा –
– मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी वरघडे, निकम तर उपाध्यक्षपदी आंभोरे, घारे । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

‘मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करा’ – खासदार सुप्रिया सुळे

Next Post

महत्वाची बातमी! जमीन एनए परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला, जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
NA-Plot

महत्वाची बातमी! जमीन एनए परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.