तळेगाव दाभाडे येथे पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मृत विवाहितेच्या पतीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळशी पतलावत (वय 35, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती देवराम पतलावत (वय 40, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Husband And Wife Quarrel Spouse Death Talegaon Dabhade Police Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी (दिनांक 27 ऑक्टोबर) रोजी दुपारच्या सुमारास एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून घटनास्थळी तपास केला असा तुळशी या त्यांच्या आई आणि मुलांबरोबर घरी होत्या. त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात न्यायचे होते. त्यासाठी घरातील लोक बाहेर वाहतूक व्यवस्था करण्यासाठी गेले. मात्र ते परतल्यानंतर त्यांना तुळशी यांचा मृत्यू झाल्याचे समजले.
हेही वाचा – सोशल मीडियावर पिस्तूलाची जाहिरात करणे पडले महागात, पवनानगरच्या सराईत गुन्हेगाराला अटक
तुळशी यांना तळेगावमधील जनरल रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह अंतिम संस्कारसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी संध्याकाळी या घटनेबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. मात्र मृत तुळशी यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यू आंतरिक जखमांमुळे झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कसून चौकशी केली असता पती-पत्नीच्या भांडणात पत्नी तुळशी यांना पती देवराम याने मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा –
– पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला आग, पाहा थरारक व्हिडिओ
– खळबळजनक! भुशी डॅममध्ये बुडून युवकाचा मृत्यू, शिवदुर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांनी राबवले सर्च ऑपरेशन