मुंबई – पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला शुक्रवारी (28 ऑक्टोबर) पहाटे आडोशी टनेलजवळ किलोमीटर 41 च्या दरम्यान भीषण आग लागली. ट्रक क्रमांक RJ 27 GD 4866 हा मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जात होता. ट्रकला पहाटे तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने आख्खा ट्रक जळाला. ( Running Truck Get Fire In Pune Mumbai Express Way Near Adoshi Tunnel )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजूला घेतली. ही माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि खोपली नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. चालक आणि त्याचा सहकारी दोघांनाही बाहेर काढण्यात यश आले.
View this post on Instagram
वाहतूक पोलीस बोरघाट, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यावेळी मदत कार्यात व्यस्त होते. सुदैवाने या अपघातात अन्य वाहने बाधित झाली नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक येथे ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनसेवेला हजारो नागरिक उपस्थित
– जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार