जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्या वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे यांचे विद्यमान अध्यक्ष उद्धव कानडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. ( Samajbhushan Award to Kishore Aware Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोरोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले आहे. त्याचीच दखल घेत संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. येत्या शनिवारी (दिनांक 29 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्याच्या नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या नवीन सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सुधीर रसाळ, भारत सासणे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे.
अधिक वाचा –
– खळबळजनक! भुशी डॅममध्ये बुडून युवकाचा मृत्यू, शिवदुर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांनी राबवले सर्च ऑपरेशन
– मावळ तालुक्यातील लाखो भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! भातविक्री आणि किंमतीचे टेन्शन होणार दूर