मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) निगडे गावातील ( Nigade Village ) पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शनिवार (29 ऑक्टोबर) रोजी निगडे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. अतिथी महिला आणि गावातील महिला-भगिनींच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. ( Jaljeevan Mission Tap water supply scheme Nigde Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील #निगडे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.'जल जीवन मिशन' अंतर्गत या पाणी योजनेसाठी सुमारे ७४ लक्ष ९९ हजार रु.निधी उपलब्ध झाला आहे.#maval @jaljeevan_ #HarGharJal #Development pic.twitter.com/IjTIV7RDjV
— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 29, 2022
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत निगडे गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 74 लाख 99 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून गावातील अनेक वर्षे रखडलेला पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला. या भुमिपूजन समारंभाला जेष्ठ मान्यवर नेते, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक येथे ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनसेवेला हजारो नागरिक उपस्थित
– पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला आग, पाहा थरारक व्हिडिओ