पत्नीने अंघोळीसाठी पाणी उतरून न दिल्याने रागावलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी शहरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. त्यावरून पोलिसांनी संबंधित महिलेच्या पती आणि सोबत मारहाण करणारा दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जितेश तामचीकर (वय 28) आणि आकाश तामचीकर (वय 35) (दोघे रा. पिंपरी) यांच्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार (दि. 20) रोजी ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलीने तिचा आरोपी पती याला आंघोळीसाठी पाणी दिले नाही. या कारणावरून पतीने आणि त्याच्या भावाने संबंधित महिलेला बेदम मारहाण केली. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. पिंपरी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( husband beats wife crime news pimpri chinchwad )
अधिक वाचा –
– लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता । Lonavala News
– मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची ‘उमेद’ वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज – आमदार सुनिल शेळके । Maval News
– खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मोरया गोसावी मंदिर परिसराची स्वच्छता । MP Shrirang Barne