ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार वर्ल्डकपचे एकूण 5 सामने हे आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहेत. यासह महाराष्ट्रातील मुंबईतील वानखेडे मैदानावर देखील वर्ल्डकपचे अनेक सामने होणार आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे दोन ठिकाणी वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. ( ICC Mens Cricket World Cup 2023 schedule out )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाची बाब म्हणजे तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट वर्ल्डकपचे सामने होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी याबाबत बोलताना, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. बीसीसीआय सचिव जय शहा आणि संबंधितांचे त्यांनी याबाबत आभार मानले आहेत. तसेच गहुंजे इथे याबाबत आम्ही सर्व तयारी करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
आयसीसी वनडे विश्वचषकाचे पुण्यात होणारे सामने
भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर
अफगाणिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर 3 – 30 ऑक्टोबर
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 1 नोव्हेंबर
इंग्लंड विरुद्ध क्वॉलीफायर 1 – 8 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – 12 नोव्हेंबर
Pune
19 October – India vs Bangladesh
30 October – Afghanistan vs Qualifier 2
1 November – New Zealand vs South Africa
8 November – England vs Qualifier 1
12 November – Australia vs Bangladesh (Day Game)#WorldCup2023 | #CWC23— Cricket.com (@weRcricket) June 27, 2023
भारतात यंदा आयसीसी वनडे विश्वचषकाचे सर्व सामने होणार आहेत. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. विश्वचषकाचा उद्घाटनाचा सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर, अंतिम सामना देखील याच मैदानावर 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. ( ICC Mens Cricket World Cup 2023 schedule out 5 Matches will be held at Pune Gahunje Stadium )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात मोठी चोरी! चोरट्यांनी तब्बल सव्वा पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
– भर पावसात आमदार सुनिल शेळकेंचे नागरिकांकडून जंगी स्वागत; वडगावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन अन् लोकार्पण