आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेतील इयत्ता दहावीच्या 30 विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करिअरविषयक अद्ययावत मार्गदर्शन मिळावे, यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून आणि मावळ डेव्हलपमेंट फाऊंडेशन, तळेगाव यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील आतापर्यंत 85 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे. ( Ideal Study App For 10th Standard Students By Maval Development Foundation And MLA Sunil Shelke )
मंगळवार (13 डिसेंबर) रोजी श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेत दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या आयडियल स्टडी ॲप च्या कुपनचे वाटप करण्यात आले. यावेळी योगेश तुपे, कुंडलिक राऊत यांसह शिक्षकवृंदपैकी गणेश पाटील सर, देशपांडे मॅडम, भिलारे सर, क्षिरसागर सर, कऱ्हाड सर, घाटे सर आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दहावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. भविष्यातील वाटचाल, दिशा, करिअर दहावीच्या यशावर अवलंबून असते. दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला यामध्ये उज्ज्वल यश मिळालेच पाहिजे यासाठी प्रत्येक पालक वर्षभर तयारी करत असतात. प्रत्येक विषयाच्या बोर्डाला येणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि दहावी पास झाल्यानंतर लागणारे करिअर मार्गदर्शन यासाठी माेठा खर्च केला जातो. पालकांचा हा सर्व खर्च वाचावा, यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ‘आयडियल स्टडी ॲप’ उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक धड्याच्या नोट्स, स्वाध्यायाची उत्तरे, महत्त्वाचे प्रश्न, एम.सी.क्यू., अक्टिव्हिटी शीट, व्हिडिओ, बोर्डासाठीच्या सराव प्रश्नपत्रिका, तसेच करिअर मार्गदर्शन मिळणार आहे. ( Ideal Study App For 10th Standard Students By Maval Development Foundation And MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– आरटीओ अधिकाऱ्यांचे, एक पाऊल पुढे! सहलीला निघालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची बसमध्येच घेतली ‘शाळा’
– तैलबैल येथे क्लाईम्बिंग करताना खाली पडून ट्रेकर्सचा मृत्यू, शिवदुर्गच्या जवानांनी शोधला मृतदेह