Dainik Maval News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहे. अशात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार) सोमवारी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली असून वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह ठिकाणी सोमवारी (दि. १६ जून) सकाळी साडेनऊ वाजता बैठक होईल, अशी माहिती मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि पक्षाचे तालुकाअध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली आहे.
सदर बैठकीस मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुकाणू समिती, तालुका कार्यकारणी, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकारणी, शहर व विभाग अध्यक्ष आणि कार्यकारणी, सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, अशी सूचना पक्षाच्या सर्व पदाधिकारीस, कार्यकर्ते यांना करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News