Dainik Maval News : रेल्वेच्या महत्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे गेट नंबर ३२ हा दिनांक १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे भांगरवाडी रेल्वे गेट मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, अशी माहिकी रेल्वे प्रशासनाकडून गेट जवळ फलक लावून देण्यात आली आहे.
रेल्वे लाईन मधील सिग्नल व इतर अभियांत्रिकी कामे तसेच रस्त्यांची कामे करण्यासाठी सदरचा गेट बंद ठेवण्यात आला आहे. भांगरवाडी रेल्वे गेट मार्गे प्रवास करणारे कामगार, स्कूल वॅन, नांगरगाव व भांगरवाडी, कुसगाव भागातील ग्रामस्थ यांना गेट बंद केल्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आले असून रेल्वे लाईन मध्ये देखील खोदकाम करण्यात आले आहे. गेट बंद असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेचे नियोजन करीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु हा मुख्य रस्ता बंद झाल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. यातून सामान्यांचा वेळ खर्ची होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’