वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात बुधवारी (दि. 10) भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या उपस्थितीत आणि मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मावळ भाजपच्या वतीने शुक्रवारी, दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत गुरुदत्त मंगल कार्यालय नायगाव – कामशेत येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती रविंद्र भेगडे यांनी यावेळी बोलताना दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तसेच या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे आणि पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व सुपर वॉरियर्स, बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी मावळ भाजपच्या वतीने करण्यात आले. वडगाव येथील पक्ष कार्यालयातील बैठकीला पक्षाचे आजी-माजी पदाधिकी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( In background of Lok Sabha elections meeting of Maval BJP election committee concluded at Vadgaon )
अधिक वाचा –
– ‘जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय’
– अजितदादांच्या आदेशानुसार आप्पा बारणे यांना संपूर्ण सहकार्य – राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे । Maval Lok Sabha
– ‘कुणी पैसे वाटले तर घ्या, मत मात्र महाविकास आघाडीलाच करा’, मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंचा मतदारांना अजब गजब सल्ला । Maval Lok Sabha