दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इंद्रायणी भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मंगळवार (दि. 14 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता पवनानगर इथे होणार आहे. त्यामुळे यंदा इंद्रायणी भाताला किती भाव मिळणार? याचीच सर्वांना उत्सूकता लागली आहे. सर्वांचेच लक्ष आमदार सुनिल शेळके यांच्या त्या घोषणेकडे लागले आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाला जगभर मागणी असते. मावळातील इंद्रायणी तांदळाची चव ही बासमतीपेक्षाही चविष्ट असून ते आरोग्यदायी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा भात 18 ते 20 रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत होते. त्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. शेतकर्यांची पिळवणूक आणि शोषण होत होते. परंतू मावळ तालुक्यात सहकारच्या माध्यमातून गेल्यावर्षी 24 रुपये किलोने भात खरेदी करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांना स्पर्धक मिळाल्याने शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ( Inauguration of Indrayani Rice Purchase Center in Pavananagar Maval Taluka )
यंदाही दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर पवनानगर इथे इंद्रायणी भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मावळचे आमदार सुनिल शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे, आमदार संजय जगताप आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे आदींनी प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मावळात बारा ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. त्यामुळे आता यावर्षी इंद्रायणी भाताला किती भाव मिळणार? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर
– धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार