वडगांव नगरपंचायत वतीने मावळ दुर्गा अभियान या मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महिला दिनी शस्त्र पूजन करून उदघाटन करण्यात आले होते. शनिवारी (11 मार्च) या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा शुभारंभ वडगाव मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसर आणि कातवी येथील मारुती मंदिर परिसरात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला. यासह या स्वसंरक्षण प्रशिक्षणास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगांव शहरातील प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पंचमुखी मारुती मंदिर परिसरात दररोज सांय ठीक 5 वाजता तर कातवी येथील मारुती मंदिर परिसरात दररोज दुपारी 4 वाजता स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत. शनिवारपासून सुरू झालेल्या या स्वसंरक्षण प्रशिक्षणात शहरातील जवळपास 45 ते 50 मुली सहभागी झाल्या आहेत. ( Inauguration of Maval Durga Mission Self Defense Training Camp at Vadgaon More than 50 girls participated )
संरक्षण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व मुलींना आपापल्या पालकांनी वेळेवर वरील ठिकाणी पोहचते करून तसेच प्रशिक्षण संपल्यावर घरी सुखरूप घेऊन जावे. प्रशिक्षणार्थींनी कोणतीही मौल्यवान वस्तू सोबत आणू नये. प्रशिक्षणार्थी मुलींनी येताना सलवार कुर्ता परिधान केलेला असावा. तसेच येताना सोबत पाणी बॉटल घेऊन येणे इत्यादी सूचना उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीं आणि पालकांना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केल्या.
हेही वाचा – वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार – व्हिडिओ
मावळ दुर्गा अभियान स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, प्रशिक्षक किरण आडगळे, शहर समन्वयक अधिकारी दिगंबर बांडे आणि प्रशिक्षणार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– धक्कादायक! मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात 21 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू
– मावळ तालुक्यातील ऐतिहासिक भडवली गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह शिवजयंती उत्साहात साजरी