Dainik Maval News : मावळ तालुक्यातील माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे उद्घाटन आमदार सुनील शेळके, सहकारमहर्षी माऊली दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. राऊंड टेबल इंडिया फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेतील नवीन सात वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
याप्रसंगी विपूल भाई पटेल (इकोलाईट ब्लॉक्स), सुमित गुप्ता (राऊंड टेबल इंडिया फाऊन्डेशन), सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच सचिन शेळके, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, नामदेव दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, सुनिल गायकवाड, बबन आल्हाट, नितीन मुऱ्हे, बारकुनाना दाभाडे, बाळासाहेब भोंगाडे, सागर भाटीया, चंद्रकांत दाभाडे आदी मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, राऊंड टेबल फाउंडेशनचे प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून मावळच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. शिक्षण हेच खरे सामर्थ्य असून हे सामर्थ्य प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे विचार त्यांनी मनोगतात व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort