व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘व्हर्टिव्ह’तर्फे चाकण भागात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन! उद्योगाप्रती वचनबद्धता मजबूत करत ‘मेक इन इंडिया’ अभियानाला समर्थन

अंबरनाथ आणि पुणे येथील व्हर्टिव्हच्या वर्तमान उत्पादन सुविधांना पूरक असा हा नवीन प्लांट डेटा सेंटर्स, टेलिकॉम, व्यावसायिक आणि औद्योगिक अँप्लिकेशन्स यांच्यासाठी अनुरूप अशी थर्मल मॅनेजमेंट प्रॉडक्ट्स बनवतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 9, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
VERTIV-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे (दि. 9 जानेवारी) : जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि निरंतरता उपाय प्रदान करणाऱ्या व्हर्टिव्हतर्फे डेटा सेंटर्स आणि साहाय्यक इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुण्यातील चाकण येथे आपल्या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. अंबरनाथ आणि पुणे येथील व्हर्टिव्हच्या वर्तमान उत्पादन सुविधांना पूरक असा हा नवीन प्लांट डेटा सेंटर्स, टेलिकॉम, व्यावसायिक आणि औद्योगिक अँप्लिकेशन्स यांच्यासाठी अनुरूप अशी थर्मल मॅनेजमेंट प्रॉडक्ट्स बनवतो आणि देशातील आणि विदेशातील बाजारपेठांना पुरवठा करतो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

२१०००० चौरस फुट / १९५१० चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळात पसरलेली ही सुविधा २०० डब्ल्यू ते २ एमडब्ल्यू + दरम्यानच्या कूलिंग सोल्यूशन्सच्या निर्मितीत मदत करते. यामध्ये एडिअबॅटिक फ्री कूलिंग चिलर्स, मोठी कस्टम एअर हॅंडलिंग यूनिट, थर्मल वॉल युनिट्स, मोठ्या डायरेक्ट एक्सपान्शनची नवी श्रेणी, पॅकेज केलेले डीएक्स आणि ऊर्जा-सक्षम युनिट्स सहित फ्री कूलिंग, इन-रो कूलिंग युनिट्सची नवी श्रेणी, वॉल माऊंट युनिट्स आणि रॅक कूलिंग सिस्टमचा समावेश आहे. या सुविधेत अत्याधुनिक परफॉर्मन्स परीक्षण, समर्पित ग्राहक अनुभव सेंटर आणि डिझाईन सपोर्ट क्षमता प्रदान करण्यासाठी सायकोमेट्रिक लॅब आहेत. ही सुविधा इंडिया ग्रीन बिल्डिंग काऊंसिलला अनुरूप असलेल्या पार्कमध्ये स्थित आहे, जे स्थिरता आणि पर्यावरणावर प्रभाव कमी करण्यावर फोकस करते. ( Inauguration of New Manufacturing Facility Plant at Chakan Pune by VERTIV )

या नवीन सुविधेबद्दल बोलताना व्हर्टिव्हचे कार्यकारी अधिकारी जिओर्डानो (जिओ) अल्बर्टाझी म्हणाले की ,“जागतिक डिजिटायझेशनचे वाढते प्रमाण आणि आर्टिफिश्यल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला अंगीकार यामुळे डेटा सेंटर उद्योगात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच डेटा सेंटर थर्मल आणि पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरसह इतर कारणांसाठी अधिक क्षमतेची मागणी होत आहे. आम्ही आमची तिसरी उत्पादन सुविधा भारतात उभारत असल्यामागचे मुख्य कारण हे आहे की, भारत एपीएसी प्रांतात डेटा सेंटर हब म्हणून नावारूपाला आला आहे. शिवाय, जागतिक मागणी पूर्ण करण्याबरोबरच ही सुविधा या देशातील डेटा सेंटर ईकोसिस्टम पोसण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.”

व्हर्टिव्ह इंडियाचे मॅनिजिंग डायरेक्टर शुभाशीष मजुमदार म्हणाले की, “भारतातील डेटा सेंटर उद्योगात देशी आणि विदेशी कंपन्यांमधून लक्षणीय गुंतवणूक करण्यात येत आहे. अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर असलेला आमचा नवीन प्लांट आम्हाला अधिक थर्मल व्यवस्थापन क्षमता प्रदान करण्यास, लीड टाइम सुधारण्यात आणि अत्यंत अनुरूप, मोठी आणि जटिल सोल्यूशन्स प्रदान करण्याची आमची क्षमता वाढवण्यास मदत करेल. ग्लोबल ऑफरिंगव्यतिरिक्त व्हर्टिव्ह भारतातील अनोखे पर्यावरण आणि देशातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या आवश्यकता यांना अनुरूप सोल्यूशन्स देईल, ज्यामुळे इष्टतम कामगिरी आणि विश्वसनीयता साध्य होईल. ही नवीन सुविधा व्हर्टिव्हला मेक इन इंडिया उपक्रमास साहाय्य चालू ठेवण्यास मदत करेल.”

  • एका जेएलएल रिपोर्ट अनुसार, भारतातील डेटा सेंटर उद्योग आगामी तीन वर्षात तब्बल ६७८ एमडब्ल्यू प्रसारासाठी सज्ज आहे आणि २०२५ पर्यंत त्याची क्षमता १४०० एमडब्ल्यू पोहोचणार आहे. यामुळे, भारत जगातील १३व्या क्रमांकाचे सर्वात मोठे मार्केट बनेल. शिवाय, इंडिया ब्रीफिंगच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत ४५ नवीन डेटा सेंटर्स विकसित होऊ घातली आहेत, ज्यांचे एकत्रित क्षेत्रफळ १३ मिलियन चौरस फुट आणि क्षमता १०१५ एमडब्ल्यू असेल आणि त्यांच्यामुळे हा व्यवसाय २०२७ पर्यंत $९.२७ वर पोहोचेल.

अधिक वाचा –
– अबब… विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण! तलाठी भरती परीक्षेत नेमका काय घोटाळा झालाय? वाचा सविस्तर । Talathi Bharti
– शेतात टॉवर बसवण्याच्या बहाण्याने गरीब शेतकऱ्याची फसवणूक, शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime News
– शिवली गावचा पै. विपुल आडकर ठरला ‘मावळ केसरी’ किताबाचा मानकरी; पै. सनम शेख बनली ‘महिला मावळ केसरी’ । Maval Kusti Kesari


dainik maval jahirat

Previous Post

भटके-विमुक्त समाजासाठी शासनाचा पुढाकार; शिधापत्रिका वितरणासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत विशेष मोहिम

Next Post

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.