Dainik Maval News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वडगाव मावळ येथील शाखेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालय उद्घाटन नुकतेच करण्यात आले. तसेच यावेळी २०२३-२४ ह्या वर्षात ९० टक्के पेक्षा जास्त कर्ज वसुली दिलेल्या प्राथमिक शेती संस्थांचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.
अत्यंत नीट-नेटकी, प्रसन्न वास्तु, सुंदर अशी अंतर्गत सजावट, CCTV ने सुरक्षित, अद्ययावत संगणक यंत्रणा ह्या सगळ्या सोयी-सुविधा घेऊन नव्या दमाने नव्या जोमाने ग्राहकांसाठी, सभासदांसाठी वडगाव मावळ शाखा सज्ज झालीये, असे उद्घाटन प्रसंगी आमदार शेळके यांनी सांगितले.
तसेच, येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेती आणि शेती पूरक जोड धंद्याना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडून लागू कराव्यात अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीने केली. यावेळी २०२३-२४ ह्या वर्षात ९० टक्के पेक्षा जास्त कर्ज वसुली दिलेल्या प्राथमिक शेती संस्थांचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.
सदर उद्घाटन प्रसंगी आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक माऊलीभाऊ दाभाडे, तुकाराम उर्फ बुवा ढोरे, माऊली ठाकर, संभाजी राक्षे, पंढरीनाथ ढोरे, यादवेंद्र खळदे, संदीप काशीद, विलास मालपोटे, संभाजी शिंदे, किसनराव वहिले, भरतभाऊ येवले, गुलाब खांदवे – झोनल ऑफिसर, सुरेशभाऊ चौधरी, नारायण ठाकर इ. मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड