सोमवारी (6 फेब्रुवारी) शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. नव्या टर्मिनलमुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यापारी यांना मोठा फायदा होणार आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. तसेच पुणे रेल्वे स्थानकावर देखील यार्ड रिमोल्डिंगचे काम सुरू होणार असल्याने शिवाजीनगर स्थानकावरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे आता शिवाजीनगर स्थानकावरून लोणावळ्यासाठी 4 लोकल सुटणार आहेत. पुणे स्थानकावरून लोणावळ्यासाठी एकूण 20 लोकल जात होत्या. त्यापैकी 1 लोकल आधीपासूनच येथून सुटत होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
असे असेल नवे वेळापत्रक
शिवाजीनगर ते लोणावळा
सकाळी – 6:35 वाजता
सायंकाळी – 5:15 वाजता
रात्री – 8:35 वाजता
रात्री – 9:05 वाजता
लोणावळा-शिवाजीनगर
दुपारी – 3:30 वाजता
सायंकाळी – 7:00 वाजता
सायंकाळी – 7:35 वाजता
रात्री – 10:35 वाजता
सदर टर्मिनसच्या उद्घाटनावेळी खासदार गिरीश बापट हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. तर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी शिवाजीनगर-तळेगाव लोकलला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमावेळी डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडळ अभियंता विजयसिंह दडस, जोएल मैकेंजी, मनीष सिंह, स्थानक व्यवस्थापक संजय कुंभार, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांची उपस्थिती होती. ( Inauguration of new terminal at Shivajinagar railway station now There will be 4 rounds from Pune to Lonavala local )
अधिक वाचा –
– लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध हॉटेलमध्ये न्यूड पार्टी, पोलिसांच्या छाप्यात अश्लील नृत्य करणारे 53 जण ताब्यात
– मोठी बातमी! लोणावळा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, 342 पोती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात