(टाकवे बुद्रुक प्रतिनिधी) :: मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी पार पडला, त्यावेळी बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जांभूळ येथील अर्धवट काम पूर्ण न झालेला रेल्वे भुयारी मार्ग नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला.
दरम्यान नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा देणारे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे अशा प्रकारे श्रेय लाटण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न केला. परंतु सद्यस्थितीला अर्धवट असणाऱ्या या भुयारी मार्गातून नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूचे काम अर्धवट असल्यामुळे मोठाले जेसीबी डंपर च्या साह्याने येथे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीने सुरू असून येणाऱ्या पावसाळ्यात हे काम पूर्ण होईल का? हाच खरा प्रश्न आहे. ( Inauguration of partially constructed Jambhul Railway Subway on occasion of Maval MP Srirang Barne birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली व आपली जाहिरात करण्यासाठी खासदारांनी हे काम पूर्ण होण्याआधीच नागरिकांसाठी हा रस्ता खुला केला खरा, परंतु या रस्त्यावर लगतच्या बाजूने मोठमोठाले दगड मुरूम खाली ढासळत असून या पुलाची रिटर्निंग वॉल अद्यापही पूर्ण केलेली नाही. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधार असतो. तसेच पोलिसांना गुन्ह्याच्या कार्यात मदत म्हणून तिसरा डोळा कार्य करणारे चांगल्या दर्जेचे सीसीटीव्ही लावणे देखील गरजेचे आहे. तसेच कुठल्याही प्रकारची लाईटची सुविधा यात उपलब्ध करून दिलेली नाही.
टाकवे व कान्हे औद्योगिक वसाहतीतील गाड्या या मार्गाने जात असतात. परंतू किती उंचीच्या गाड्यांना या ठिकाणी जाण्यास परवानगी आहे, याचा काही सूचनाफलक नसल्यामुळे एखादी गाडी यात अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसवणे, आरसे बसविणे गरजेचे असून यामुळे अनेक अपघात टाळता येतील.
या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संपर्क केला असता; “जांभूळ येथील गेट नंबर 47 भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने वर्षभरापासून बंद असल्या कारणाने कान्हे फाटा येथील गेट नंबर 45 वरती खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना तासन – तास या ठिकाणी थांबावे लागत होते. त्यामुळे आंदर मावळ मधील वाहतूक संघटना अध्यक्ष राजू शिंदे, एकविरा कृती समिती अध्यक्ष भरत मोरे तसेच आंदर मावळ मधील 60 ते 70 गावातील नागरिकांनी व टाकवे बुद्रुक, कान्हे फाटा येथील औद्योगिक वसाहत मधील कामगारांनी जांभूळ येथील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे अर्धवट असलेल्या भुयारी मार्गाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी मार्ग खुला करावा लागला आहे. अर्धवट असलेले काम महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदार यांना दिले आहेत.”
हेही वाचा – आंदर मावळातील 40 गावांना जोडणारा जांभूळ रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
“जांभूळ येथील मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असल्यामुळे घरी जाण्याचे अंतर कमी झाले आहे. परंतु रात्रीच्या वेळी या मार्गातून जाताना कुठल्याही प्रकारची लाईट नसल्यामुळे भीतीदायक वाटते तसेच या मार्गावर खोदकाम केल्यामुळे छोटे-मोठे दगडही रस्त्यावर येत आहे. (जांभूळ स्थानिक रहिवासी)
अधिक वाचा –
– सोमाटणे फाटा इथे बेदरकारपणे बस चालवून पादचाऱ्याला दिली धडक, नागरिकाचा मृत्यू
– मावळात क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटलांची मैदानावर जोरदार फटकेबाजी – पाहा व्हिडिओ