पवन मावळातील पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या मौजे शिळींब गावात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर स्थानिक रहिवासी एकनाथ दरेकर आणि त्यांचे चिरंजीव अर्जून दरेकर यांनी अत्याधुनिक पद्धतीचे वॉशिंग सेंटर सुरु केले. त्यांच्या या वॉशिंग सेंटरचे उद्घाटन एसीपी (असिस्टंट कमांडंट ऑफ पुलीस CRPF) विकास कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे मा. सरपंच, मा. उपसरपंच, पोलिस पाटील आणि नागरिक, महिला भगिनी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिळींब हे गाव तसे पवन मावळातील दुर्गम भागात आहे. या गावात आजही हव्या तशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. परंतू आता गावातील तरुण पुढे येऊन नवीन व्यवसाय सुरु करत आहेत. त्यातून गावाची बाजार पेठ उभी राहत असून गावाला नवा आकार येत आहे. याचा फायदा फक्त शिळींब गावालाच नाहीतर तर पंचक्रोशीत असलेल्या अनेक गावांना होत आहे. एकेकाळी दुचाकीत हवा भरण्यासाठीही अनेक किलोमीटर दुरवर जावे लागत. तसेच अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठीही पवनानगर अथवा जवणला जावे लागत. परंतू आता गावातच अनेक किराणा दुकाने, हॉटेल्स, विविध वस्तूंची दुकाने सुरु होत आहेत. यातून स्थानिकांची गरज स्थानिक पातळीवरच भागत आहे. ( Inauguration of washing center in Shilimb village by acp Vikas Kumbhar )
अधिक वाचा –
– भाजपच्या मतदार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद; 5700 हून अधिक नवमतदारांची नोंदणी
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
– ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची । अभिवादन नवदुर्गांना