Dainik Maval News : होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन संस्थेने जेस्टॅम्प कंपनी व पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय येथे सोलर पथदिवे आणि महिला व बालस्नेही फिरती बस प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, जेस्टॅम्प कंपनीने मुख्य वित्तीय अधिकारी अजय चौधरी, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशने वित्तीय अधिकार शकील शेख, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, टाकवे ग्रामपंचायत सरपंच अविनाश असवले यांच्या हस्ते करण्यात आले.
या बसच्या माध्यमातून आंदर मावळ परिसरातील ३३ गावांमध्ये आरोग्य, बाल संरक्षण, शिक्षण व ग्रामविकास या विषयांवर जनजागृती मोहिमा राबविणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रकल्पाची सविस्तर माहिती समुदाय विकास समन्वयक ऋषिकेश डिंबळे यांनी दिली.
सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात यांनी, संस्थेच्या गेल्या ४ वर्षांच्या कामाचे कौतुक करत सांगितले की, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशने आंदर मावळ परिसरात ग्रामविकास,पाणी व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण व शैक्षणिक सहाय्यता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अजय चौधरी यांनी सांगितले की, जेस्टॅम्प कंपनीच्या सी एस आर निधीमधून भविष्यातही असे सामाजिक प्रकल्प राबवले जाणार असून, समाजासाठी भरीव योगदान देण्याचा आमचा संकल्प आहे.
या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी बाळासाहेब मतकर, बालविकास व्यवस्थापक वैशाली पवार, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक सुभाष गायकवाड, तसेच विविध गावांचे ग्रामसेवक, सरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी