मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून नदीच्या मार्गातील अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्याची परिस्थिती गुरूवारी (दि. 25) निर्माण झाली होती. तसेच इंद्रायणी नदीच्या प्रवाहात असलेले इंदोरी जवळील कुंडमळा येथील कुंडदेवी मातेचे मंदिर देखील गुरूवारी पाण्याखाली गेले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्याने येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे नदीचे पाणी साकव पुलापर्यंत आले होते. तसेच कुंडमळा परिसरातील कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले होते. कुंडमळा परिसरात वर्षाविहार करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र सध्याची पाण्याची, पावसाची परिस्थिती पाहता प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले निर्बंध लक्षात घेता, कुंडमळा येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ( Increase in water level of Indrayani river Kundevi temple under water tourists banned in Kundmala area )
राज्यात सध्या सर्वदूर पाऊस सुरू आहे,. मावळ तालुक्यात देखील तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे इंद्रायणी, पवना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बुधवार पासूनच पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांना बंदी आहे.
अधिक वाचा –
– महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam
– Breaking News : मुसळधार पावसाचा इशारा असल्याने सर्व शाळांना शुक्रवारी देखील सुटी जाहीर । Pune News
– टाकवे पूल पाण्याखाली गेल्याने आंदर मावळातील 40 ते 50 गावांचे दळणवळण ठप्प ! Maval News