Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवार, सोमवार दोन दिवस येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसे पाहता शुक्रवारपासूनच परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पवन मावळ विभागात डोंगराळ भागात तर गेली दोन दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे ओढे नाल्यांना पूर आला आहे. परिणामी पवना धरणातील आवक वाढली असून धरणातील जलसाठा 93 टक्क्यांच्या पार गेला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
धरण परिसरातील पावसाची परिस्थिती पाहून आणि धरणात होणारी आवक पाहता आज (रविवारी) सकाळीच धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. रविवार सकाळी धरणातील विसर्ग 5000 हून वाढवून तो 7070 करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यावरून 5670 क्युसेक तर जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक असा एकुण 7070 क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू करण्यात आला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. ( Increased discharge of water from Pavana Dam Heavy rain in Maval taluka )
यानंतर पवना नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात पवना धरण 93 टक्के भरले असून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असल्याने नदी काठच्या सर्व नागरीकांनी काळजी घ्यावी, नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, अशा खबरदारीच्या सुचना देण्यात आल्याआहेत. पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने ही माहिती दिली.
अधिक वाचा –
– पवना धरण 92 टक्के भरले ! पावसाचा जोर वाढल्याने धरणातून 5000 क्युसेक विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी । Pavana Dam Updates
– ‘अभी नहीं तो कभी नहीं…’ भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात मावळ विधानसभा लढविण्याचा निर्धार । Maval BJP News
– स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News