Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी येथे देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गरजी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या ह्सते विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गावामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम चांदखेड ग्रामपंचायत सदस्य उर्मिला गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका अर्चना सिरसाट यांनी केले. विद्यार्थ्यांचे डंबेल्स कवायत घेण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेषा व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक विकास रासकर यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थी भाषण आणि विद्यार्थ्यांचा कथ्थक डान्स घेण्यात आला. यावेळी अभिनेते जॉकी श्रॉफ उर्फ जेके फाउंडेशन यांचे सदस्य सचिन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना हस्ताक्षर वही, पेन पेन्सिल कलर बॉक्स, खाऊ वाटप करण्यात आले. तसेच एकात्मिक बालविकास अंगणवाडी सेविका शोभा थोरवे आणि जिजाबाई केवळ यांच्याकडे विद्यार्थ्यांसाठी पाटी व पेन्सिल वाटप करण्यात आले.
सर्व पालकांचे स्वागत शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष गोविंद टेकले, उपाध्यक्ष प्रकाश भालेराव, रेखा पारधे, रेश्मा मधे, गणेश पारधे, नितीश घोगरे ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ केदारी, संदीप गावडे, किशोर गावडे यांच्या हस्थे करण्यात आले. तसेच आदिवासी ठाकर समाजातील चंदनवाडी शाळेची माजी विद्यार्थीनी सपना हरिभाऊ केदारी, ही पहिल्यांदाच गावामधून शासकीय सेवेतील पोलीस दलामध्ये पोलीस कॉनस्टेबल पदी निवड झाली. त्याबद्दल तिचाही विशेष सत्कार जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी तर्फे कारण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत चांदखेड गावचे सरपंच मीना दत्तात्रय माळी, उपसरपंच प्रमोद गायकवाड, सागर गायकवाड, दिनेश गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! आता लोणावळ्याशिवाय होईल मुंबई – पुणे प्रवास, मध्य रेल्वेकडून दोन नवीन मार्गांचे प्रस्ताव – वाचा सविस्तर
– तळेगावमध्ये मतदार नोंदणी अभियान, भाजपाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी कक्ष सुरू । Talegaon Dabhade
– वडगावातील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval