Dainik Maval News : श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या श्री दत्त महाराज मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. पहिल्या दिवशी श्री दत्त महाराज मूर्तीची ग्रामदिंडी प्रदक्षिणा (मिरवणूक) झाली. या मिरवणुकीत आळंदी येथील चैतन्य आध्यात्मिक गुरुकुल वारकरी पथकासह हजारो भाविक सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी श्री दत्त महाराज मंदिरात धार्मिक विधी, होमहवन झाले. यावेळीही धार्मिक विधीस शेकडो भाविक उपस्थित होते.
अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात करवीर पीठाचे (कोल्हापूर) शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते श्रीदत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा झाला. यावेळी गुलाब महाराज खालकर, शंकर महाराज मराठे उपस्थित होते. याप्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी तुषार महाराज दळवी यांचे कीर्तन झाले, यावेळीही भाविकांची गर्दी लक्षणीय होती.
दरम्यान, सोहळ्यानिमित्त श्री पोटोबा महाराज मंदिर, श्री दत्त मंदिर व बाजारपेठेत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी मंदिराचे बांधकाम करणारे ए व्ही जी ग्रुपचे अक्षय बेल्हेकर, विनय लवंगारे, गणेश झरेकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री पोटोबा महाराज देवस्थान ट्र्स्टने आणि ग्रामस्थांनी संपूर्ण सोहळ्याचे संयोजन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
– मावळच्या जागेबाबत अधिकृत निर्णय समोर आल्यानंतर आम्ही आमची भुमिका जाहीर करू – रविंद्र भेगडे