Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या डावा व उजवा कालवा बंदिस्त करणे, तसेच आढले – डोणे उपसा जलसिंचन योजनेबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बुधवारी (दि. 21 मे) रोजी मंत्रालयात ही बैठक पार पडली.
यावेळी बैठकीस पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, मावळचे आमदार सुनील शेळके, जलसंपदा विभागाचे सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वडीवळे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सुमारे 4406 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. परंतु सदर कालव्यांतून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील बहुतांश जमीन पाणथळ व नापीक होत असल्याने तसेच सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी या कालव्यांना बंदिस्त करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती.
त्याचप्रमाणे आढले – डोणे परिसरातील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी पवना नदीवरून उपसा जलसिंचन योजना राबविण्याबाबत देखील सातत्याने पाठपुरावा सुरु होता. याबाबत जलसंपदा मंत्री महोदयांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना या कामांचा विकास आराखडा शासनाकडे तात्काळ सादर करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News