तळेगाव दाभाडे येथे भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर सोशल मिडिया आघाडीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थितीत होते. ( Intellectual Conference Talegaon Dabhade In Present Of BJP Keshav Upadhyay )
यावेळी मोदी सरकारच्या माध्यमातून 2014 ते 2022 या 8 वर्षात देशात झालेले धोरणात्मक व क्षेत्रात्मक परिवर्तन यावर केशवजी उपाध्ये यांच्यासह इतर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या प्रसंगी पुणे भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, उद्योजक रामदास काकडे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष रविंद्र माने, शहर भाजपा प्रभारी वैभव कोथुळकर, श्रीमती सुनंदा जोशी, किरण परळीकर, रिटायर ग्रुप कॅप्टन साठे सर, संतोष भेगडे पाटील, सुरेश साखवळकर, डॉ राहुल मुंगीकर, डॉ. अमित वाघ, एड विनय दाभाडे, डॉ प्रमोद दाभाडे, स्वानंद आगाशे, केदार तापकीर यांच्यासह तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र देहू येथे किल्ले बनवा स्पर्धेला उदंड प्रतिसाद, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते बक्षिस वाटप
– कामशेतमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’, महिला भगिनींचा कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद