व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भयंकर! भरधाव कारने 8 वारकऱ्यांना चिरडले, मुख्यमंत्री शिंदे हळहळले, 5 लाखाच्या मदतीचे घोषणा

कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूरहून पंढरपूरकडे पायी निघालेल्या 8 वारकऱ्यांना एका भरधाव कारने चिरडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 1, 2022
in महाराष्ट्र
Car-Accident

Car Accident At Sangola


कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूरहून पंढरपूरकडे पायी निघालेल्या 8 वारकऱ्यांना एका भरधाव कारने चिरडले. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ सोमवारी (31 ऑक्टोबर) सायंकाळी उशीरा हा अपघात घडला. या भयंकर अपघातात 8 वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अन्य 6 वारकरी गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील घोषणा केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ( 8 Warkari Died In Road Accident At Sangola Taluka Solapur Who Were Going To Visit Shri Vitthal Temple Pandharpur )

हेही वाचा – Video : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आडगाव येथे 2 मुलांचा बुडून मृत्यू

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी ५ लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 31, 2022

नेमकं काय घडलं?

कोल्हापुरातील वारकऱ्यांची दिंडी सोमवारी सायंकाळी 7 वाजता सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी एमएच 12 डीई 7938 ही टाटा नेक्सॉन कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी गावातील या दिंडीमध्ये एकूण 32 वारकरी होते. या अपघातात 5 महिला, 2 पुरुष आणि 1 लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अधिक वाचा –

– वडगावमध्ये भक्तीमय वातावरणात सुरु आहे काकडा आरती सोहळा
– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे बुद्धिजीवी संमेलन संपन्न, केशव उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

मावळचं राजकारण I मामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, भाच्याने ठणकावून सांगितले

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke-&-Bala-Bhegade

मावळचं राजकारण I मामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, भाच्याने ठणकावून सांगितले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.