International Yoga Day 2024 : शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. आज जागतिक योग दिनाच्या (दि. 21 जून) निमित्ताने तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथील कर्मचारी वर्गासाठी ‘सहजयोग ध्यान’ या विषयावर मार्गदर्शन आणि योग प्रात्यक्षिक हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जागतिक योग दिनाचा इतिहास –
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 2014 च्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही प्रस्तावाचे सहप्रतिनिधी होते. प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. दिनांक 21 जून 2015 या दिवशी पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.
21 जून हीच तारिख का निवडली?
21 जून या दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजर करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे. 21 जून हा वर्षांत सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला ‘उन्हाळी संक्राती’ असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. 21 जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या योग दिनाची थीम-
दरवर्षी 21 जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे.
अधिक वाचा –
– वतन इनामी जमिनीबाबत कायदा करून कडक अंमलबजावणी व्हावी, रामोशी समाजाच्या जमिनी हडपल्या जात असल्याचा गंभीर आरोप
– मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी वाचा एका क्लिकवर । List of All Tourist Places In Maval Taluka
– चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन