Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तळेगाव दाभाडे परिसरात आमदार शेळके यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड दरोडाविरोधी पथकाने मोठ्या शस्त्रसाठ्यासह संशयितांना जेरबंद केले होते.
दरम्यान, या कटामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश काढले असून, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याकडे या एसआयटीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या पथकात सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने, सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ, पोलिस हवालदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे, सुनील सगर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आमदार शेळके यांनी लक्षवेधी मांडणी करताना सांगितले होते की, माझा संशयितांशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातील असून इतका मोठा शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च कोण उचलतोय? नामांकित वकिलांची फी कोण भरतोय? त्यांना पाठबळ देणारा नेमका कोण आहे? याची सखोल चौकशी व्हावी.
त्यावर गृहराज्यमंत्री कदम यांनी सात दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विशेष तपास पथक कामाला लागणार असून तपास सुरू होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल