Dainik Maval News : “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा उपविभागात कारवायांचा धडाका लावला आहे. सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मागील एक आठवड्यात एम. डी. पावडर, गांजा विक्री करणारे, बेकायदा मटका आणि जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात कारवाया केल्या आहेत.
पहिल्या कारवाईत लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी वार्ड लोणावळा याठिकाणी ताबान पठाण या 28 वर्षीय युवकाला मेफेड्रॉन पावडर अर्थात एम डी पावडरची विक्री करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या कडून ३.६२ ग्रॅम वजनाची एम डी पावडर जप्त करण्यात आली. त्याच्या विरुद्ध लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला त्याच्या विरोधात NDPS एक्ट १९८५ चे कलम ८(क), २१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दुसऱ्या कारवाई मध्ये सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वरसोली टोलनाक्याजवळ नाकाबंदी लावून त्या ठिकाणावरून मोटारसायकल वर बसून गांजा घेऊन विक्रीसाठी जाणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली. या कारवाई मध्ये अक्षय गोपीनाथ जाधव व प्रल्हाद आसाराम जाधव अशा दोघांवर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे (NDPS) कलम ८(क), २०(ब)(ii), BNS ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १५.१२८ किलो गांजा सह १,६०,५१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तिसऱ्या कारवाई मध्ये सत्यासाई कार्तिक यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तुंगार्ली गावात एका बंगल्यात छापा टाकून त्याठिकाणी बेकायदेशीर जुगार खेळत असलेल्या तब्बल 14 जणांवर कारवाई केली. या सर्वांवर मुंबई जुगार कायदा १८८७ कलम ४, १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई मध्ये एकूण ५,८३,९६२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City