Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहराला आणि मावळ तालुक्याला वरदान असलेली पवना नदीची शुद्धता आणि स्वच्छचा टिकावी यासाठी गेल्या 20 वर्षापासून पवना माईचा उत्सव साजरा करण्यात येतो. जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये पवनानगर परिसरातील गावे, प्राथमिक-माध्यमिक शाळा सहभागी होत असतात.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, ज्ञानप्रबोधिनी निगडी, ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे, संकल्प इंग्लिश स्कूल, वारू कोथूर्णे माध्यमिक विद्यालय, पवना विद्या मंदिर, सरुबाई दळवी ज्युनिअर कॉलेज, सिटीप्राईड निगडी,एस. एन.बी.पी पिंपरी, मॉडर्न इंग्लिश स्कूल निगडी, ए.सि. एस.कॉलेज, जे. एस. पी.एम. एस. ताथवडे, तसेच अनेक सेवाभावी संस्था यांनी या उत्सवात सहभाग घेतला होता.
पवना धरण या ठिकाणी जलपूजन करून दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पवना नदीवरील ब्राह्मनोली घाटावर दिंडी चे परिसरातील शाळांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पवनामाईची आरती करून स्वच्छतेच्या घोषणा दिल्या.
नदीचे पूजन करण्यात आले. पवना नदीची कृतज्ञता म्हणुन नदीत कणकेचे दिवे सोडण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जलदिंडी प्रतिष्ठानचे बाबासाहेब काळे यांनी विद्यार्थ्यांना पवना नदीचा उगम, नदीचा आवाका, नदीची अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती या बाबत सखोल माहिती दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News