जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जल जीवन मिशन व गाळयुक्त शिवार इत्यादी शासनाच्या विविध योजनांची जलरथामार्फत प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत असून या जलरथाला पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी जिल्हा परिषद येथे हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब गुजर, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नितीन शहा व त्याची संपूर्ण टिम व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जलरथ जिल्ह्यातील एकूण 1 हजार 385 ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये एकूण 1 हजार 843 गवांपैकी 1 हजार 401 गावे स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. (Jalarath Of Ministry of Jal Shakti Government of India In Pune District)
मार्च 2024 अखेर सर्व म्हणजे 1 हजार 843 गावे हागणदारी मुक्त घोषीत करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यांतील 13 तालुक्यांतील सर्व 1 हजार 843 गावांत जलरथामार्फत योजनांची माहिती देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ फिरणार आहे, अशी माहिती गुजर यानी दिली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणेंकडून अडीच कोटी निधी देण्याचा संकल्प, एक कोटीचा धनादेश सुपूर्द
– सिडकोच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, वाढीव रक्कम होणार कमी, लवकरच मिळणार ताबा । Maval Lok Sabha News
– पुढील 30 वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; वाचा काय म्हणाले अजितदादा । Pune News