शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) महाळुंगे, बालेवाडी इथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगतात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केला.
महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत 56 सुवर्ण पदकांसह एकूण 161 पदके मिळवून तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह 140 पदके मिळवून अव्वल कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवले. ऑलिम्पिकमध्येही चांगले यश मिळावे यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ( January 15 will be celebrated as State Sports Day Chief Minister Eknath Shinde announced )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– न्यू इंग्लिश स्कुलमध्ये विद्यर्थिनींसाठी अद्ययावत स्वछतागृह; महिंद्रा एक्सलो कंपनीचा उपक्रम । Vadgaon Maval
– अबब…! पवनानगर इथे आढळला तब्बल 9 फुटी अजगर, सर्पमित्रांनी दिले जीवदान
– वडगावमधील राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश; अशोक मते यांचा खास सन्मान