Dainik Maval News : मावळ तालुक्यात जॅपनीज एन्सेफलायटीस (जेई) लसीकरण मोहीम 2025 प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार मावळ पंचायत समितीमध्ये झालेल्या तालुका स्तरीय बैठकीत करण्यात आला.
जॅपनीज एन्सेफलायटीस (Japanese Encephalitis) हा आजार 15 वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. या आजारात सुमारे 70 टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात किंवा त्या रुग्णामध्ये दीर्घकालीन नुरोलोजिकल अक्षमता आढळून येतात. या आजारावर दीर्घ काळ नियंत्रण घालण्यासाठी जेई लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्र, सर्व शासकीय व खासगी शाळा अंतर्गत 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग आणी शालेय शिक्षण विभाग (माध्यमिक व प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यासाठी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागांच्या प्रमुखांची नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.
- याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शॅरन सोनवणे, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल कोतागडे, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात आदींसह तालुका स्तरावर तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, परिचारिका, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शॅरन सोनवणे यांनी या कार्यशाळेत जॅपनीज एन्सेफलायटीस (जेइ) या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली व लसीकरणाचे महत्व विषद केले. मावळ तालुक्यात 1 ते 15 वर्षे वयोगटातील 91 हजार 620 मुले असून त्यांच्या लसीकरणाचे नियोजन या कार्य शाळेमध्ये करण्यात आले.
जॅपनीज एन्सेफलायटीस आजाराची लक्षणे
1. हा आजार संक्रमीत कुलेक्स डासांच्या चावण्यामुळे होतो
2. खूप ताप येणे, डोके दुखी, हातपाय आकडणे
3. उदासीनता, बेशुद्ध होणे, अर्धांग वायू आकडी येणे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका