व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात वन व वन्यजीव व्यवस्थापनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुशील मंतावार यांना राज्यस्तरीय पदक जाहीर

वन विभागाकडून वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय पदक देऊन गौरविले जाते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 13, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
State-level medal to Sushil Mantawar for remarkable work for forest wildlife management in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय पदक देऊन गौरविले जाते. त्यानुसार नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पदक प्राप्त अधिकाऱ्यांच्या यादीत मावळ तालुक्यात वन संरक्षण व संवर्धनासाठी काम केलेले तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांना रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.

  • २०२१ ते २०२४ या कार्यकाळात मावळ तालुक्यात शिरोता हद्दीत वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असताना सुशील मंतावार यांनी अत्यंत प्रभावी काम केले होते. वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी तसेच वन संरक्षण व संवर्धनासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. यात जंगल बंधारे बांधणे, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे निर्मिती, वणवे रोखण्यासाठी उपाययोजना, वन संपत्ती बचावासाठी जनजागृती मोहीम आदी उपक्रम राबविले होते. सुशील विठ्ठलराव मंतावार यांच्या कार्याची दखल घेत यांना सन २०२०-२१ वर्षांतील वन / वन्यजीव व्यवस्थापन कार्य प्रकारातील रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.

सुशील मंतावार यांची गतवर्षी शिरोता येथून वाशीम येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. सध्या ते सहाय्यक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहे. तत्पूर्वी त्यांनी मोहरली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्र अधिकारी, बीआरटीसी चंद्रपूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी व शिरोता मावळ येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम केले आहे.

वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाकडून प्रतिवर्ष सुवर्ण, रजत पदक बहाल करून गौरविण्यात येते. मुख्य वनसंरक्षकांनी पाठविलेल्या शिफारसींमधून राज्यस्तरीय पदक निवड समिती अधिकारी, कर्मचारी यांची निवड करते. त्यानुसार वन विभागाकडून सन २०२०-२१, सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या तीन वर्षांत उत्कृष्ठ काम केलेल्या सहा कार्यप्रकारांसाठी राज्यस्तरीय पदक निवडीच्या शिफारसीनुसार एकूण ७६ अधिकारी, कर्मचारी यांना पदके जाहीर केली आहेत. राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कार्यासन अधिकारी वि. श. जाखलेकर यांनी याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (दि.११) प्रसिद्ध केला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News

Next Post

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गहुंजे येथून एकाला अटक । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गहुंजे येथून एकाला अटक । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.