रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा म्हणून रोटरी सिटीने काम करावं असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉ शशिकांत पवार यांनी देवदूत व जीवदया पुरस्कार समारंभ प्रसंगी काढले. ज्येष्ठ डॉ दत्तात्रय गोपाळघरे यांना देवदूत तर लोणावळा येथील भूशी डॅम येथे एका मुलीचा प्राण वाचवणारे तळेगाव शहरातील डॉ सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार प्रदान करण्यात आला. तळेगाव स्टेशन येथील रीक्रेशन हॉल मध्ये अतिशय दिमागदार अशा सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव शहरांमध्ये कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट असे कार्य करणारे कोरोना योद्धा म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला असे ज्येष्ठ डॉ दत्तात्रय गोपाळघरे यांना त्यांच्या सामाजिक जाणीव मधून कार्य करत असलेल्या डॉक्टरी पेशासाठी देवदूत या रोटरी सिटीच्या महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र,मावळी पगडी, शाल,सन्मानचिन्ह,तुळशी वृंदावन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच डॉ सचिन विटनोर यांना शाल, सन्मानचिन्ह व तुळशी वृंदावन देऊन त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी सिटी मध्ये काम करणाऱ्या डॉ गणपत जाधव डॉ धनश्री काळे व डॉ सौरभ मेहता यांचा सुद्धा विशेष सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गोपाळघरे सर यांनी रोटरी सिटीने मला हा पुरस्कार देऊन समाजामध्ये काम करण्यासाठी आणखीन बळ दिले आहे. तसेच रोटरी क्लब आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहे रक्तदान शिबिर असेल नेत्ररोग तपासणी,मोफत नेत्र बिंदू शस्त्रक्रिया असेल पोलिओ संपूर्ण देशातून पोलिओचे मुक्ती असेल यासाठी रोटरीचं नाव आवर्जून घेतलं जातं असे उद्गार डॉ गोपाळघरे यांनी काढले.
डॉ सचिन विटनोर यांनी मला दिलेल्या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचे उद्गार काढून रोटरी क्लब सिटीला धन्यवाद दिले. रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी यापूर्वी दिलेल्या सर्व देवदूत पुरस्कारांचा उल्लेख करून रोटरी क्लब आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कार्य करेल असे प्रतिपादन केले.
मानपत्राचे वाचन माजी अध्यक्ष AG रो दीपक फल्ले यांनी केले. याप्रसंगी डॉ निलेश नारखेडे,डॉ श्रीपाद टिळे,डॉ जया ठाकूर,सुनिता गीते,राहुल पारगे एडवोकेट बालाजी गायकवाड डॉ बडे,नयना आभळे,एस एस बारकर खो-खो कबड्डी कोच कोल्हापूर विभाग यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रसंगी डॉ श्रीकांत जातेगावकर,डॉ अमित कुलकर्णी,डॉ सोनवणे,डॉ सोनवणे मॅडम,डॉ कामत,रोटरी सिटीचे चार्टर्ड प्रेसिडेंट विलास काळोखे,श्री गडसिग साहेब,दादा उरे,सेक्रेटरी सुरेश दाभाडे, वोकेशनल डायरेक्टर निखिल महापात्रा,सुरेश धोत्रे,शरयू देवळे,अनघा कुलकर्णी,नितीन शहा,राकेश ओसवाल,विनोद राठोड,रितेश फाकटकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन राकेश गरुड,प्रदीप मुंगसे,संतोष परदेशी,प्रदीप टेकावडे,बसपा भंडारी,प्रसाद पदिर,रामनाथ कलवडे,संजय चव्हाण,दिनेश चीखले यांनी केले. प्रकल्प प्रमुख डॉ सौरभ मेहता यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले रो भगवान शिंदे यांनी आभार मानले सूत्रसंचालन डॉक्टर धनश्री काळे व रो प्रशांत ताये यांनी केले.
अधिक वाचा –
– ग्रामीण भागात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News
– महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान
– तळेगावची वैष्णवी मखर बनली सीए, बारावीपासूनचे स्वप्न केले साकार । Talegaon Dabhade