Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ आणि पँथर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ आणि १२ मे रोजी भगवान गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
- दोन दिवशीय जयंती महोत्सवात सकाळी सामुहिक बुद्ध वंदना आणि धम्म प्रवचनाने सुरुवात झाली. प्रिस्टाईन आयुर फाउंडेशन,पुणे चे संचालक मा डॉ प्रवीण बढे यांच्या संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अकरा मे रोजी रात्री जाहीर सभेत भगवान बुध्द ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर..लोक उत्थानाची गाथा या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते संजय आवटे यांचे व्याख्यान झाले.
‘प्रचारकी माध्यमापासून सावध रहा आणि नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी त्यांच्याशी सतत बोलले पाहिजे, संवाद साधला पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला’. तसेच यावेळी प्रकाश पवार, उपप्राचार्य फर्ग्युसन कॉलेज आणि अनिल सूर्यवंशी, माजी अधीक्षक अभियंता पिंपरी प्राधिकरण यांनीही परिवर्तनाच्या चळवळीबाबत मार्गदर्शन केले. प्रभाकर वाघमारे हे सभा अध्यक्ष होते.
चंद्रजीत वाघमारे, किरण ओव्हाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले, अनिकेत सोनावणे यांनी प्रास्तविक, दिपक भालेराव यांनी मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला तर मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांनी सूत्र संचालन केले. संतोष भालेराव यांनी आभार मानले.
यावेळी व्होडाफोनच्या २५,००० रु. शिष्यवृत्ती धारक कु स्नेहा सोनावणे, पीएचडी मिळविलेल्या तेजस्वी क्षीरसागर, दहावीला ९० टक्के गुण प्राप्त कु समिक्षा क्षीरसागर, एनसीएस तर्फे रणजी पूर्व सरावासाठी निवड झालेले क्रिकेटियर कुमार अमर रणजीत कदम या मंडळातील गुणवंत यशवंतांचा सत्कार, गुणगौरव मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. तसेच वढू गावचे गोपाळ गायकवाड यांचे वंशज तथा मंडळाचे सदस्य गणेश गायकवाड यांचाही गौरव करण्यात आला. सभेनंतर शाहिर अंजिक्य लिंगायत यांचा शाहिरी भीमगर्जना हा प्रबोधनपर गीते, पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.
- दिनांक १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष बुद्ध वंदना आणि प्रवचन घेण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून बुवा बाबांकडून करण्यात येणारे चमत्कार व त्यामागील वैज्ञानिक सत्य विशद करुन दाखविण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भारत विठ्ठलदास यांचे प्रात्यक्षिकांसह व्याख्यान झाले.
सायंकाळी भगवान गौतम बुद्ध यांचे बुद्धरूप व महाषुरूषांच्या पुतळ्यांची भव्यदिव्य जोशपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शेकडो युवक युवतींना आबाल वृध्दांचा सहभाग होता. मंडळाच्या वतीने संपूर्ण महोत्सव उत्साहात व शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.
यावेळी भास्कर म्हाळसकर, रुपेश म्हाळसकर, मयूर ढोरे, विशाल वहिले, अतुल राऊत, सुनीता कुडे, राजेंद्र कुडे, गुलाबराव म्हाळसकर, सायली म्हाळसकर, अनंता कुडे व इतर अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे, सचिव सुधाकर वाघमारे, अर्चना भालेराव, सरिता आल्हाट व दोनही मंडळ कार्यकारिणीचे, सर्व सदस्य यांनी यशस्वी व नेटके संयोजन केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश