व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खरीप हंगामाच्या तयारीत बळीराजा मग्न ! शेतात नांगरट, भाजणीच्या कामांना वेग ; बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव । Maval News

मान्सून यंदा लवकर येणार, तसेच जून - जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 20, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका हा खरीप भात उत्पादनासाठी प्रसिद्ध तालुका असून तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग खरीप हंगामात पिके घेत असतात. सध्या पावसाळा तोंडावर आला असल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत मग्न असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. यंदा मान्सून पाऊस वेळेआधीच डेरेदाखल होणार असल्याने आणि अधिक पाऊस बरसणार असल्याने शेतकरी त्यापार्श्वभूमीवर वेगाने शेतातील कामे उरकून घेत आहेत.

मान्सून यंदा लवकर येणार, तसेच जून – जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील खरीप भात पीक उत्पादक शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. खरीप भात पिकाला अधिक पाऊस फायदेशीर ठरतो, यामुळे यंदाचा मान्सून लाभदायक ठरणार, असा शेतकऱ्यांचा होरा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतर आणि पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांकडून शेतीतील कामांचा वेग वाढविण्यात आला आहे. ( Farmers in Maval taluka prepare for Kharif season )

  • मावळ तालुक्यात १५ हजार ते १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जातात. या पिकांमध्ये सुमारे १३००० हेक्टर क्षेत्रावर केवळ भात पीक घेतले जाते. त्यातही इंद्रायणी भाताचे पीक सर्वाधिक घेतले जाते, ज्या पिकाला सर्वाधिक पाऊस हवा असतो. तर इतर भाताचे वाणही कमी अधिक प्रमाणात मावळातील शेतकरी घेतात. राहिलेल्या दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावर संकरित ज्वारी, भुईमूग, चवळी, वाटाणा ही कडधान्ये तसेच नाचणी ही पिके घेतली जातात.

मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ हे त्यांच्या विभागातील अधिकारी – कर्मचारी यांच्या समवेत शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वीची कामे आणि खरीप हंगामात करावयाची कामे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. मान्सूनच्या पावसाचे आगमन वेळेत आणि पुरेसे होणार असल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामाच्या नियोजनाची तसेच बी – बियाणांची, खते – औषधाची जुळवाजुळव करू लागला आहे. मावळमधील बहुतांश शेतकरी खरीप भात पिकाचे बियाणे घेण्याचे सध्या नियोजन करीत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर । MP Shrirang Barne

Next Post

वडगावमध्ये मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ, पँथर ग्रुप आयोजित ‘संयुक्त जयंती महोत्सव’ थाटामाटात संपन्न । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Joint Jayanti Festival organized by Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal Panther Group at Vadgaon Maval

वडगावमध्ये मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ, पँथर ग्रुप आयोजित 'संयुक्त जयंती महोत्सव' थाटामाटात संपन्न । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.