व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, November 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ, पँथर ग्रुप आयोजित ‘संयुक्त जयंती महोत्सव’ थाटामाटात संपन्न । Vadgaon Maval

भगवान गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 20, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
Joint Jayanti Festival organized by Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal Panther Group at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ आणि पँथर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ आणि १२ मे रोजी भगवान गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाला.

  • दोन दिवशीय जयंती महोत्सवात सकाळी सामुहिक बुद्ध वंदना आणि धम्म प्रवचनाने सुरुवात झाली. प्रिस्टाईन आयुर फाउंडेशन,पुणे चे संचालक मा डॉ प्रवीण बढे यांच्या संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अकरा मे रोजी रात्री जाहीर सभेत भगवान बुध्द ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर..लोक उत्थानाची गाथा या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते संजय आवटे यांचे व्याख्यान झाले.

‘प्रचारकी माध्यमापासून सावध रहा आणि नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी त्यांच्याशी सतत बोलले पाहिजे, संवाद साधला पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला’. तसेच यावेळी प्रकाश पवार, उपप्राचार्य फर्ग्युसन कॉलेज आणि अनिल सूर्यवंशी, माजी अधीक्षक अभियंता पिंपरी प्राधिकरण यांनीही परिवर्तनाच्या चळवळीबाबत मार्गदर्शन केले. प्रभाकर वाघमारे हे सभा अध्यक्ष होते.

चंद्रजीत वाघमारे, किरण ओव्हाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले, अनिकेत सोनावणे यांनी प्रास्तविक, दिपक भालेराव यांनी मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला तर मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांनी सूत्र संचालन केले. संतोष भालेराव यांनी आभार मानले.

यावेळी व्होडाफोनच्या २५,००० रु. शिष्यवृत्ती धारक कु स्नेहा सोनावणे, पीएचडी मिळविलेल्या तेजस्वी क्षीरसागर, दहावीला ९० टक्के गुण प्राप्त कु समिक्षा क्षीरसागर, एनसीएस तर्फे रणजी पूर्व सरावासाठी निवड झालेले क्रिकेटियर कुमार अमर रणजीत कदम या मंडळातील गुणवंत यशवंतांचा सत्कार, गुणगौरव मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. तसेच वढू गावचे गोपाळ गायकवाड यांचे वंशज तथा मंडळाचे सदस्य गणेश गायकवाड यांचाही गौरव करण्यात आला. सभेनंतर शाहिर अंजिक्य लिंगायत यांचा शाहिरी भीमगर्जना हा प्रबोधनपर गीते, पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.

  • दिनांक १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष बुद्ध वंदना आणि प्रवचन घेण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून बुवा बाबांकडून करण्यात येणारे चमत्कार व त्यामागील वैज्ञानिक सत्य विशद करुन दाखविण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भारत विठ्ठलदास यांचे प्रात्यक्षिकांसह व्याख्यान झाले.

सायंकाळी भगवान गौतम बुद्ध यांचे बुद्धरूप व महाषुरूषांच्या पुतळ्यांची भव्यदिव्य जोशपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शेकडो युवक युवतींना आबाल वृध्दांचा सहभाग होता. मंडळाच्या वतीने संपूर्ण महोत्सव उत्साहात व शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.

यावेळी भास्कर म्हाळसकर, रुपेश म्हाळसकर, मयूर ढोरे, विशाल वहिले, अतुल राऊत, सुनीता कुडे, राजेंद्र कुडे, गुलाबराव म्हाळसकर, सायली म्हाळसकर, अनंता कुडे व इतर अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे, सचिव सुधाकर वाघमारे, अर्चना भालेराव, सरिता आल्हाट व दोनही मंडळ कार्यकारिणीचे, सर्व सदस्य यांनी यशस्वी व नेटके संयोजन केले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश


dainik maval jahirat

Previous Post

खरीप हंगामाच्या तयारीत बळीराजा मग्न ! शेतात नांगरट, भाजणीच्या कामांना वेग ; बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव । Maval News

Next Post

छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात ! राजभवनात छगन भुजबळ यांचा शपथविधी संपन्न । Chhagan Bhujbal back in Cabinet

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhagan Bhujbal back in Cabinet Chhagan Bhujbal oath taking ceremony held at Raj Bhavan

छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात ! राजभवनात छगन भुजबळ यांचा शपथविधी संपन्न । Chhagan Bhujbal back in Cabinet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.