देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील अतिशय महत्वाचा प्रश्न असलेल्या रेड झोन उठवण्यासंदर्भात आज (सोमवार, 6 मार्च) रोजी बाळा भेगडे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृह मुंबई इथे महत्वाची बैठक संपन्न झाली. ( Joint Meeting With Defense Minister And Deputy CM Devendra Fadnavis Soon On Dehurod Cantonment Red Zone Issue Said Bala Bhegade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिष्ठमंडळाकडून देहूरोडच्या जनतेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या रेड झोन संदर्भातील मुद्दा मांडण्यात आला. तसेच देहूरोड कँटोन्मेंटच्या हद्दीतून ‘रेड झोन’ रद्द करण्याची मागणी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्याकडे तात्काळ याबाबत बैठक लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शिष्ठमंडळात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, कैलास पानसरे, बाळासाहेब शेलार, मदन सोनिगरा, बाळासाहेब झेंडे, रघुवीर शेलार, राहुल बालघरे, हनीफभाई शेख, तुकाराम जाधव, उमाशंकर सिंह, विलास शिंदे, धीरज नायडू, दिनेश सिंग, रामचंद्र थोरात, अमोल नाईकनवरे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात अंमली पदार्थ विकणाऱ्याला रंगेहाथ अटक, तब्बल पाऊणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
– वडगावमध्ये पारंपारिक दगडी गोटे उचलण्याची स्पर्धा, बैठकांचा विक्रम करणाऱ्या खेळाडूला मिळणार चांदीची गदा