मावळ तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची बांधणी अगदी जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी शहर, वॉर्ड भागात नव्या कार्यकारणीची निवड केली जात असून नव्याने कार्यकर्ते, पदाधिकारी यांना जबाबदारी देत पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नुकतीच मनसे लोणावळा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मावळ मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवार (5 मार्च) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराची नवीन कार्यकारणी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. मनसे मावळ अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत असताना, वडगाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, लोणावळा शहर मनसे अध्यक्ष भारत चिकणे उपस्थित होते. ( Maharashtra Navnirman Sena Lonavala City New Executive Announced Appointment Letter Issued By Rupesh Mhalskar Maval )
नवनियुक्त कार्यकारिणी –
उपाध्यक्ष – दिनेश कालेकर, मधुर पाटणकर, सुनील भोंडवे
चिटणीस – निखिल सोमन
संघटक – अभिजीत फासगे
प्रसिद्धीप्रमुख – उमेश बोडके
प्रवक्ते – अमित भोसले
यावेळी निखिल भोसले, खंडू बोभाटे, अजिंक्य बोभाटे, निलेश लांडगे, देवेश सोमन, वैभव पाटणकर, मोहीनीश पाटणकर, सिद्धेश कोणेकर, गुरुदास मेने यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळात मनसेचा डंका! वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी सायली म्हाळसकर बिनविरोध
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; देवस्थानबाबत राज ठाकरेंचा ग्रामस्थांना शब्द, म्हणाले…