हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज (सोमवार, 6 मार्च) पुणे जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. मावळ तालुक्यातही ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस बरसला. तालुक्यातील अनेक भागात गारपीट देखील झाली. त्यामुळे या अवकाळी पावसाने बळीराजा देखील आता संकटात सापडला आहे. ( Unseasonal Rain In Maval Taluka Pune Video Viral )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
साधारण दुपारी तीन ते चार वाजल्यापासूनच वातावरणात मोठे बदल होऊ लागले होते. आभाळात ढगांची काजळी पसरू लागली होती. तसेच वातावरणात देखील उष्णता जाणवू लागली होती. त्यामुळे पाऊस येणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार ढग वाजू लागले आणि पाठोपाठ विजांचा कडकडाट होऊन वारा वाहू लागला व काही क्षणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. साधारण दोन ते तीन तास पावसाची जोरदार बॅटींग सुरु होती.
मावळ तालुक्याला या अवकाळी पावसाने बहुतांश भागात झोडपले. आंदर मावळ, पवन मावळ या भागातही पाऊस झाला. तसेच वडगाव, तळेगाव, कामशेत या शहरी भागातही पाऊस झाला. वडगाव मावळ भागात तर गारपीठ झाली. अवकाळी पावसाने शेतकरी देखील संकटात सापडला आहे.
अधिक वाचा –
– देहूरोड कॅन्टोन्मेंट रेड झोन प्रश्नाबाबत लवकरच संरक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत संयुक्त बैठक – बाळा भेगडे
– तळेगाव दाभाडे शहरात अंमली पदार्थ विकणाऱ्याला रंगेहाथ अटक, तब्बल पाऊणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त