Dainik Maval News : “वेगवान युगातही पत्रकारिता अस्तित्व टिकवून आहे, याचे श्रेय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जाते”, असे प्रतिपादन देवराई संस्थेचे संस्थापक, माजी उपनगराध्यक्ष गिरीश खेर यांनी केले. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि. ६) मयुरेश डायनिंग हॉल येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
त्यावेळी गिरीश खेर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद शाखा मावळचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, सल्लागार योगेश्वर माडगूळकर, कार्याध्यक्ष काकासाहेब काळे, उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, सचिव डॉ. संदीप गाडेकर, खजिनदार अंकुश दाभाडे, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, माजी अध्यक्ष महेश भागीवंत, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे ,मयुर सातपुते, अमित भागीवंत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ काळे यांनी केले. पत्रकारांचे सद्यस्थिती व पत्रकार कसा असावा यावर ज्येष्ठ पत्रकार आमिर खान यांनी मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण पुरंदरे म्हणाले, पत्रकारांनी जागल्याची भूमिका पार पाडावी. जागरूक पत्रकारच समाजाला न्याय देऊ शकतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. यावेळी मयुरेश डायनिंग हॉल यांच्यावतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
लोकशाही बळकटीकरणात पत्रकारांचे योगदान खूप मोठे आहे. पर्यावरण रक्षणासाठी पत्रकारांनी अधिक जोमाने काम केले पाहिजे.समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, विविध समस्या, प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे धैर्य पत्रकार दाखवतात. – गिरीश खेर
अध्यक्षीय भाषणात विलास भेगडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा भेगडे यांनी केले. अंकुश दाभाडे यांनी आभार मानले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

