व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

करंजगावात २६ विद्यार्थ्यांना सायकल आणि १०० आदिवासींना ब्लँकेट वाटप ; पसायदान NGO व मावळ मराठी पत्रकार संघ यांचा उपक्रम

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार दिन ( दि. ६ ) करंजगाव ( नाणे मावळ ) येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 8, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Bicycles distributed to 26 students and blankets to 100 tribals in Karanjgaon Nane Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार दिन ( दि. ६ ) करंजगाव ( नाणे मावळ ) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण, मानवता आणि सेवाभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप व आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट वितरणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

पत्रकार दिनानिमित्त मावळ तालुक्यातील करंजगाव येथील प्राथमिक शाळेतील २६ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले, तर १०० आदिवासी महिला व पुरुषांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचत समाजप्रबोधनाचे कार्य कसे केले, याची आठवण करून देत त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पसायदान संस्थेचे राजेश बद्रे, संजीव येलगे, वर्षा येलगे, रत्नाकर जाधव, अभा गुप्ता, सागर काकडे उपस्थित होते.

यावेळी पोलीस पाटील राजश्री तंबोरे, सरपंच उज्वला पोटफोडे, माजी सरपंच कौशल्या पवार, माजी सरपंच शरद सोरकाते, उपसरपंच नवनाथ ठाकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग गोडे, ग्रामसेवक चंद्रकांत मोरे, योगेश माझिरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश साबळे, संतोष पवार, अशोक गोडे, सुदाम कुडले, कांताराम दहातोंडे, रवींद्र पवार, सुरेश वाघमारे, काळूराम वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, साधू पोटफोडे, संदीप पोटफोडे, विजय खेंगले, सोमनाथ पोटफोडे, जयश्री कुडले, सविता मिसाळ, आरती साठे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेखा पोटफोडे, काजल साबळे, पुनम ठाकर, सुषमा शेलार, तुकाराम भालशिंगे, पुनम पोटफोडे, सतीश कांबळे, सुरेश उंडे उपस्थित होते.

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, उपाध्यक्ष भारत काळे, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, खजिनदार संकेत जगताप यांसह विशाल कुंभार, शिवानंद कांबळे, प्रफुल्ल ओव्हाळ, सागर शिंदे, प्रशांत पुराणिक, रेश्मा फडतरे, संजय हुळावळे यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पसायदान संस्थेचे संजीव येलगे यांनी सायकल चालविण्याचे आरोग्यविषयक फायदे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक भान आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. हा कार्यक्रम पसायदान संस्था व मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती


Previous Post

Talegaon Dabhade : बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे वेगवान युगातही पत्रकारितेचे अस्तित्व टिकून – गिरीश खेर

Next Post

आरोपीला अटक करण्यासाठी श्रीरामपूर येथे गेलेल्या तळेगाव दाभाडे पोलिसांच्या पथकावर जमावाचा हल्ला ; एक पोलीस जखमी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

आरोपीला अटक करण्यासाठी श्रीरामपूर येथे गेलेल्या तळेगाव दाभाडे पोलिसांच्या पथकावर जमावाचा हल्ला ; एक पोलीस जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.