कामशेत पोलीस स्टेशन इथे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी कामशेत पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासुनच गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणुन अवैध धंद्यांविरोधात कारवाया, रोड पेट्रोलिंग, सतर्क नाकाबंदी, पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेणे इ. प्रकारे पोलिस निरिक्षक रविंद्र पाटील यांनी गुन्हेगारांना वचक बसविला आहे. ( Kamshet police arrested one accused with village gun and live cartridge )
त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दिनांक २८ जुलै २०२३) रोजी कामशेत पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका व्यक्तीकडे अग्निशस्त्र हत्यार व जिवंत राऊंड असल्याबाबतची खात्रीशीर बातमी पोलिस निरिक्षक पाटील यांनी मिळाली होती. त्यानुसार कामशेत पोलिस स्टेशनचे पो.नि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने लागलीच सापळा रचला. केलेल्या कारवाईत आरोपी रमेश सुरेश मानकर (वय ३३ वर्ष, रा. वेल्हवळी, ता. मावळ, जि. पुणे सध्या रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) याने मौजे नाणे गावच्या हद्दीत एका घराच्या गोठ्यात लपवून ठेवलेले एक सिंगल बोअरची गावठी बंदूक व त्यासोबत एकुण 3 जिवंत काडतुसे (राऊंड) पंचांसमक्ष काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले.
नमुद आरोपीविरोधात कामशेत पोलिस स्टेशन इथे भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सफौ शेख करत आहेत. सदरचा संवेदनशील प्रकार कामशेत पोलीस स्टेशनचे पथकाने उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनचे पो. नि. पाटील, पोसई चव्हाण, सफौ शेख, पो. हवा तावरे, पो.ना सातपुते, पो. ना. विरणक, पो. शि राऊळ यांचे पथकाने केली आहे. ( Kamshet police arrested one accused with village gun and live cartridge )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मोहरम’च्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात रुट मार्च, जाणून घ्या मोहरम बद्दल
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News